जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल प्रिन्स पॅलेससमोर मालवाहू रिक्षाने पायी जाणाऱ्या मुलाला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जून दिनकर कोळी (वय-१६ , रा. नांद्रा हवेली , ह.मु. कुसुंबा ता. जि.जळगाव ) हा मुलगा मित्रांसोबत ८ सप्टेंबररोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पायी जात होता. अजिंठा चौकातील हॉटेल प्रिन्स पॅलेस समोर एमएच १९ सीवाय ५०५२ क्रमांकाच्या मालवाहू गाडीने अर्जूनला धडक दिली. यात अर्जूनचा पाय फ्रॅक्चर झाला त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले . अर्जूनचा मित्र ऋषीकेश समाधान कोळी यांच्या फिर्यादीवरून मालवाहू वाहनाच्या चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहेत .







