जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मेहरुण परिसरातील विश्वकर्मा नगरात कोमल चेतन ढाकणे वय २४ या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवार सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली मयत कोमलचे हिचे पती चेतन अरुण ढाकणे हे पोलीस कर्मचारी असून भुसावळ बाजारपेठ पेालीस ठाण्यात नोकरीला आहे. पतीसह सासू यांच्याकडून होणार्या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून कोमल हिने आत्महत्या केल्याचा आरोप कोमलचे वडील प्रविण शामराव पाटील रा. मेहरुण यांनी केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांची तपास करीत आहे.

कोमलचे पती तसेच सासू हे दोन्ही चिमुकल्यांना सोबत गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे मेहरुण तलावाकडे मंदिरावर दर्शनाला गेले होते. यादरम्यान घरी एकटी असलेल्या कोमलने छताला गळफास घेवून आत्महत्या केली. दर्शनानंतर पती तसेच सासू सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी परतले असता,
कोमल ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मृत घोषित केले. कोमल हिच्या पश्चात पती चेतन, सासू मंदाबाई व दोन मुले आयुष (४ वर्ष) व पियुष (पाच महिने) असा परिवार आहे. रात्री उशिरा पर्यंत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.







