जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील हॉस्पीटलमध्ये काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
शहरातील २३ वर्षीय तरूणी एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. ४ सप्टेंबररोजी काम करत असतांना संशयित आरोपी विजय चौधरी उर्फ पल्टी (वय-२४, रा. रथ गल्ली पारोळा ) याने हॉस्पिटलमध्ये येवून नर्स तरूणीला अश्लिल शिवीगाळ करीत विनयभंग केला. नंतर तरूणीने जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून संशयित आरोपी विजय चौधरी याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे करीत आहे.