देवपूर, ता.जि.धुळे (प्रतिनिधी) – येथील आदिशक्ती कानुश्री प्राथमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक कौस्तुभ पाटील यांना राजनंदिनी फाऊंडेशन जळगाव यांच्यातर्फे दिला जाणारा सन २०२१-२२ या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.शिक्षक दिनी या पुरस्काराची घोषणा राजनंदिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.एस.डी.वाघ यांनी केली आहे.कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आजवर राबविले आहेत.कौस्तुभ पाटील हे विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सतत धडपडत असतात.विद्यार्थी गृहभेट,पालक संवाद,सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन व आयोजन,मुक्तशिक्षण उपक्रम,बालजत्रेचे आयोजन,दप्तविना शाळा,प्रश्नमंजुषा उपक्रम,पाढे व इंग्रजी गुणवत्ता वाढ उपक्रम असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ केली आहे.या उपक्रमांची दखल घेत आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केल्याचे राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ.एस.डी.वाघ .जळगाव कुणबी मराठा वधुवर ग्रुप गौरी उद्योग समूह चे संपादक अध्यक्ष सुमित पाटील यांनी कळवले आहे.
श्री.कौस्तुभ पाटिल हे धुळे येथील श्री.रविंद्र उत्तम खैरनार (धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढ़ी व धुळे व नंदुरबार ग.स.बँकचे गटनेते)यांचे चिरंजीव आहेत.