यावल ( प्रतिनिधी ) – येथील स्व. पुंडलिक येऊल यांचे पुत्र मोहन येऊल (मेजर) हे सेंट्रल रिज़र्व पुलिस फोर्स (CRPF) मधुन 24 वर्ष 06 महिन्यांची सेवा करून हवालदार पदावरून ३१ ऑगस्टरोजी सेवानिवृत्त झाले .


मोहन येऊल हे आसाम, जम्मू कश्मीर, त्रिपुरा, पंजाब, पुणे सेंटर , झारखंड आणि छत्तीसगढला तैनात होते या जवानाचे यावल येथील नागरीकांनी उत्साहाने स्वागत केले यावेळी विजय बारी, रविन्द्र पाटील, ईश्वर बारी, अनिल बारी , संजय बारी आणि बारी समाज मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिल्या राहुल महाजन, प्रशांत पाटील, शरद बारी, उमेश बोरसे, नवाज तडवी, अँड बिपिन पाटील, भूषण बागुल, महेश नेव, विजय पवार, विजय लावने, प्रशांत रणधीरे सेवानिवृत्त सैनिक संजय पाटील, सैनिक अमोल भोईटे महेन्द्र पाटील, विरावली यांनीही शुभेच्छा दिल्या आता लष्कर आणि अन्य पोलीस दलांमध्ये भरतीसाठी इच्छूक तरुणांना मोहन येऊल मार्गदर्शन करणार आहेत.







