अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री पावली देवीच्या जुन्या व खंडित झालेल्या मूर्त्यांच्या जागी राजस्थान येथून आणलेल्या मुर्त्या स्थापित होणार आहेत. त्यासाठी श्री पांच पावली देवी जीर्णोद्धार समिती गेल्या काही दिवसांपासून रोज बैठका घेऊन जोरदार तयारी करीत आहे. ४ रोजी दुपारी तीन वाजता वाडी संस्थान येथून मूर्त्यांची भव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह ढोल, ताशे, बँड, लेझीम पथक असतील. भाविक बंधूंनी पांढरा नेहरू शर्ट पांढरी पॅंट या वेशात शोभायात्रेत सहभागी व्हायचे आहे तर भगिनींनी पारंपारिक वेशात शक्य झाल्यास डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी व्हायचे आहे. ६ वाजता पाचपावली देवी मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता होईल.५ रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रधान संकल्प, गणपती पूजन पुण्याहवाचन, पंचांग कर्म होईल. दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत पिठस्थ देवता स्थापन , जलाधीवास, स्नपन, न्यास, धान्यधीवास ,नवग्रह हवन,शय्याधीवास, सायंपूजन आरती होईल.६ रोजी सकाळी ८ ते १२ प्रात:पूजन , शांती,पुष्टी,कुटीर होम,प्राय होम,प्रतिष्ठा होम,स्नपन हवन, मुख्य देवता हवन होईल. दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत स्थापित देवता हवन, उत्तरांग हवन,बलिदान प्राणप्रतिष्ठा, पूर्णाहुती, श्रेयदान होईल.५ वाजता महाआरती व सांगता होईल. सायंकाळी ६ ते ९ दर्शन व प्रसाद .
या पूजेचे मुख्य यजमान पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आहेत. मुख्य धार्मिक विधी प्रसंगी प्रसाद महाराज यांची आशीर्वादपर विशेष उपस्थिती राहील.या महान धार्मिक ऐतिहासिक प्रसंगी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थिती द्यावी , असे आवाहन जीर्णोद्धार समितीसह उद्योगपती विनोद पाटील, उद्योगपती बीपीनबापू पाटील व समस्त पाटील परिवाराने केले आहे.