सर्व पक्षीय सव्वा वर्षाच्या अध्यक्षपदाचा फार्मूला?

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय पॅनल ची बैठक पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,भाजपा, शिवसेना ,या चार पक्षांना सव्वा वर्षाचा अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाचा फार्मूला असणार असून आता सर्व पक्ष पॅनलवर बैठकीत शिक्कामोर्तब झाला आहे. परंतु जागा वाटपामध्ये तिळा निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.भाजपनेते गिरीश महाजन हे बैठकीला येण्यास विलंब झाल्याने सर्वपक्षीय नेत्यांची चांगलीच धांदल उडाली होती. आ. गिरीश महाजन यांच्याशी मोबाईलवर संभाषण झाल्यानंतर ते बैठकीला हजर झाले पाच वर्षात जिल्हा बँकेत चार चेरमन असणार असून चारी पक्षांना संधी मिळणार आहे पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच जिल्हा बँक चेअरमन पदासाठी चारी पक्षाचे नेते एकत्र बसून चेअरमन ची निवड करणार आहे. सोसायटी मतदार संघ व्यतिरिक्त इतर सहा जागांमध्ये चुरस असून महिला राखीव साठी चारी पक्षांचा आग्रह असणार आहे. दोन महिलांना संधी मिळणार असल्याने एकमत होईल का याकडे लक्ष लागले आहे . तूर्त सर्वपक्षीय पॅनल जरी शिक्कामोर्तब झाला असला तरी ऐनवेळी जागावाटपात निर्माण झाल्यास निवडणूक होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.







