एरंडोल (प्रतिनिधी) – देवाधर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या सरकारमुळे देवी-देवतांचे मंदिर बंदिस्त असल्याने लाखो गरिबांची उपासमार होत आहे. मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपतर्फे घंटानाद शंखनाद आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी एरंडोल भाजपा व आध्यात्मिक आघाडीच्यावतीने मंदिर उघडण्यासाठी शंखनाद , घंटानाद आंदोलन मारुती मढी, मारुती मंदिराजवळ करण्यात आले
महाराष्ट्रात मंदिरे बंद ठेवून लाखो गरीबांची रोजीरोटी हिरावून घेण्यात आली म्हणून राज्य शासनाचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले
माजी नगराध्यक्ष रवींद्रअण्णा व भाजपा तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले
भाजपा तालुका सरचिटणीस अमोल जाधव , भाजपा शहराध्यक्ष निलेश परदेशी, भाजपा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत महाजन , भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सुनिल चौधरी, प्रदीप पाटील , निखील सूर्यवंशी, कल्पेश पाटील , अनिल महाजन, आप्पा महाजन व सर्व पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.








