जळगाव (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील लासूर येथिल 30 वर्षीय तरुणांला राहत्या घरा जवळ साप चावल्याने आज जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. सुमऱ्या चौधरी बारेला असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती असी की. चोपडा तालुक्यातील लासूर येथे गाव बाहेरील प्लाँट भागात राहाणाऱ्या सुमऱ्या चौधरी बारेला वय ३० याला दि. २५ रोजी संध्याकाळी घरा जवळ साप चावल्याने लागलीच त्याला जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी उपचारासाठी दाखल केले. आज दि. २७ रोजी सकाळी ७:३० वाजता उपचार दरम्यान मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.निता पवार यांच्या खबरी वरून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास अनिल फेगडे, दिनेश पाटील करत आहे.







