जळगाव (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील मोरगाव येथे शेतात किटकनाशक विषारी औषध सेवन केल्याने ५४ वर्षीय इसमाचा आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती असी की. रावेर तालुक्यातील मोरगाव येथे राजेंद्र भालचंद्र धिवरे (वय५४) यांनी दि. २५ रोजी शेतात किटकनाशक विषारी औषध सेवन केल्यामुळे त्यांना जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आज सकाळी ९:३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पवार यांच्या खबरीवरून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास अनिल फेगडे,दिनेश पाटील करीत आहे.







