जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पहूर येथे शिवसेना व महा विकास आघाडीतर्फे नारायण राणे अटकेच्या आनंदोत्सव फटाक्यांची आतिषबाजी साजरा करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला येथील बस स्टँड परिसरात महा विकास आघाडीतर्फे फटाक्यांची आतिषबाजी आनंद उत्सव साजरा करून शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आगे बढो या जोरदार घोषणेने पहूर परिसर दणाणून सोडले याप्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते तथा पत्रकार गणेश पांढरे उपसरपंच शाम भाऊ सावळे शहर प्रमुख संजय तायडे माजी शहरप्रमुख सुकलाल बारी युवासेना उपतालुका प्रमुख अमीन शेख सादिक पठाण इरफान शेख उपशहर प्रमुख सुभाष पाटील प्रकाश पाटील गणेश तायडे कैलास पांढरे शेतकरी सेना तालुका संघटक भाऊराव गोंधन खेडे यांच्यासह शिवसैनिक महा विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









