एरंडोल (प्रतिनिधी) – उत्राण,तालुका एरंडोल येथे स्वातंत्र दिनानिमित्त राधे राधे सामाजिक संस्थचे अध्यक्ष जितेंद्र चौधरी व वायूपुत्र क्रीडा प्रसारण मंडळ अध्यक्ष भिकन कोळी यांनी भारताच्या 75व्या स्वातंत्र दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अगोदर, उत्राण गावाचे प्रगतशील शेतकरी शंकर बापु चौधरी यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने भारतमातेच्या प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले,तसेच कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर असलेले माजी सैनिक यांनी सलामी देऊन राष्ट्गीत म्हणण्यात आले आणि मग रक्तदान शिबिर चे उदघाटन निलॉन्स कंपनीचे एच आर राजेश घोरपडे,भागवत पाटील शंकर बापु चौधरी,सरपंच चंद्रकांत वाघ,उपसरपंच योगेश महाजन,ग्रामसेवक अहिरे ,उपसभापती अनिल महाजन,ग्राम पंचायत सदस्य जितेंद्र महाले,वाल्मिक कोळी,सागर बियाणी,दिनेश सोनवणे,बबलू महाजन,विनोद महाजन,हरेश पांडे,गौतम कैरणार,राजेंद्र महाजन,भास्कर मोरे,मनोज मिस्तरी,विलास महाजन, दीपक महाजन,प्रकाश कुवर अमोल महाजन,उत्राण हायस्कूलचे लढे सर चव्हाण सर, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद
रक्तदान करणाऱ्या 129 रक्तदात्यानां संस्थेच्या वतीने चांदीची लक्ष्मी प्रतिमा, जेवणाचा डबा ,व प्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले, गोदावरी ब्लड बँक यांच्या कडे रक्तदानाच्या बॅग सुपूर्द करण्यात आल्या ,वायू क्रीडा प्रसारण मंडळ चे अध्यक्ष भिकन कोळी,उपाध्यक्ष योगेश चौधरी,सचिव अनिल चौधरी व सदस्य मंडळ,राधे राधे सामाजिक संस्थांचे अध्यक्ष जितेंद्र चौधरी,उपाध्यक्ष भावेश चौधरी,सचिव कविता चौधरी,खजिनदार दत्तू चौधरी,पांडुरंग चौधरी,व कार्यकारी संचालक मंडळ उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र चौधरी यांनी तर आभार भिकन कोळी यांनी मानले.







