तळोदा (प्रतिनिधी) – बाळदा (ता. कुकरमुंडा) येथे अक्षय भगवान कलाल यांच्या घरी उमलले दुर्मिळ व दैवी ९ ब्रम्हकमळ…

सालाबादप्रमाणे ह्या वर्षीही कलाल यांच्या घरी सुंदर ब्रम्हकमळ उमलले…
ब्रम्हकमळ या दुर्मिळ अश्या फुला विषयी अनेकांना माहिती आहेच तर काही व्यक्ती यापासुन अनभिज्ञ देखील आहेत.
हे फुल वर्षभरातून एकदाच ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत फुलते. ब्रम्हकमळ ह्या फुलाला अनेकानेक गोष्टीं मुळे विशेषता लाभली आहे. ह्या फुलांची कळी १५ दिवसाआधी दिसते, नंतर १५ दिवसा नंतर रात्री ठीक ११ ते १२ वाजेच्या सुमारास ह्या फुलाचं मूळ रूप नजरेस पडत. अत्यंत पांढरे शुभ्र व सुगंधीत असणारे फुल पाहताच अनेक जण मोहित होत असतात. ह्या फुलाला तोडण्या आधी त्याच पूजन केलं जातं, तसेच बारीक दोऱ्याच्या साह्याने तोडून महादेवाच्या मंदिरात किंवा घरातील शिव लिंगावर अर्पण केल जात असत.
अक्षय कलाल यांनी माहिती देतांना सांगितले की, माझे वडील स्व. भगवान रामलाल कलाल यांनी व्यारा (गुजरात) येथून ७ वर्षांआधी रोप आणले होते दर वर्षी त्यास १,२ इतकीच फुले येत होती. परंतु ह्या वर्षी त्या रोपाला ९ ब्रम्हकमळ आली, ब्रम्हकमळ हे दुर्मिळ व दैवी पुष्प असून त्याचे अनेक औषधी उपयोग ही आहेत.








