एरंडोल (प्रतिनिधी) – येथील गुरू हनुमान कुस्तीगीर संस्था आणि न्यू ड्रीम क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व आणि गायन स्पर्धा संपन्न झाल्या यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या स्पर्धकांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक़्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष रमेश परदेशी, प्रा. मनोज पाटील, नगरसेवक नितीन महाजन, योगेश महाजन, बबलु चौधरी, दशरथ चौधरी, बळीराम महाजन, बी. के. धुतसर उपस्थित होते. निरीक्षक म्हणून प्रा. सुधीर शिरसाठ,बी.के.धुत व डी.एस.पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमास हाजी अहमद खान, नवल धनगर, बोरसे सर, दिलीप पाटील, आदित्य साळी आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन क्षमा तायडे, योगेश्वरी मराठे यांनी तर आभार कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भानुदास आरखे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेेसाठी पंकज पाटील, अनिल मराठे, दिलीप सोनवणे, अनिल आरखे, अनिल भोई, ऋषीकेश महाजन, विजय महाजन, दुर्गादास वानखेडे, नयन आरखे, मनोज उंबरे, सविता आरखे, सुरेखा मराठे, सुरेखा सोनवणे, नुपूर वानखेडे यांनी परिश्रम घेतल.








