एरंडोल (प्रतिनिधी) – स्वातंत्र्यदिनानिमित्त एरंडोल येथील आगारात जिल्ह्यातील चालक – वाहक यांच्यातील कुशल गुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपिठ ‘ मिळावे या संकल्पनेत येथील वाहतूक निरीक्षक गोविंदा बागुल यांनी देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, आगार प्रमुख विजय पाटील, उपनरगाध्यक्ष अस्लम शेख, प्रशिक्षणार्थी अधिकारी जयेश पाटील, प्रशिक्षणार्थी आगार प्रमुख दिलीप महाजन आदी व्यासपि’ावर उपस्थित होते.
यावेळी एम.एम.सैय्यद एरंडोल, मनोज बाविस्कर शिंदखेडा, जागृती केळकर अमनेर, मनिषा ‘ाकरे चोपडा, राजू पाटील पाचोरा या चालक वाहकांनी देशभक्तीपर गीते गायली व उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळविली. यावेळी त्यांचेवर रोख स्वरुपात बक्षिसांचा वर्षाव उपस्थित अधिकारी मान्यवरांकडून करण्यात आला. आगारात प्रथमच अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने उपस्थित मान्यवरांनी आयोजकांची प्रशंसा केली. यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी या कार्यक्रमाला भरभरुन दाद दिली व वेळावेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती दिली. एरंडोल आगारातील चालक एम.एम. सैय्यद यांना प्रथमपासूनच गायनाची आवड आहे. तसेच अन्य गायिका जागृती केळकर या एरंडोल आगाराच्या वाहक होत्या सद्या त्या अमळनेर आगारात कार्यरत आहेत. सर्व गायकांनी देशभक्तीपर गितांचा सदाबहार नमुना सादर केला. वाहक किशोर मोराणकर यांनी सदाबहार असे सुत्रसंचलन केले. तर वाहक डी.डी. निकुंभ यांनी साऊंडची बाजु सांभाळली.
कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव…
एरंडोल येथील आगारात स्वातंत्र्यं दिनानिमित्त प्रथमच देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम वाहतूक निरीक्षक गोविंद बागुल यांच्या संकल्पनेतुन व आगार प्रमुख विजय पाटील यांच्या प्रेरणेतून एक उत्कृष्ठ असा कार्यक्रम पार पडला आणि तो चांगल्या प्रकारे यशस्वीही झाला. अशा कार्यक्रमांद्वारे जिल्ह्यातील विविध आगारातील कर्मचाऱ्यामधील कुशल गुणांना वाव मिळाला. चालक – वाहक यांनी उत्कृष्ठ असे देशभक्तीपर गीते गायनाचा कार्यक्रम सादर केला.







