जळगाव न्यायालयाचा निकाल

जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखून फुस लावून पळवून तीच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जळगाव न्यायालयाने १० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील विजय निंबा ठाकरे (वय २१) याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेवून अत्याचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.
या प्रकरणी १० जून २०१९ रोजी भांदवी ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी चाळीसगाव पोलिस स्टेशनमध्ये पिडीत मुलीचे जबाब देखील घेण्यात आले होते. या जबाबावरून गुन्ह्यातील कलम वाढवून जळगाव न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.
सरकार पक्षातर्फे १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.सरकार पक्षातर्फे निलेश चौधरी यांनी युक्तीवाद केला. न्या.डी.एन.खडसे यांनी आरोपीस पिडीतेला लग्नाचे अमिष दाखवून पळवून अत्याचार केल्या प्रकरणी ७ वर्षाची शिक्षा तसेच पोक्सो कलमनुसार १० वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.







