नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपला देश करोनाशी लढाई लढतो आहे, आत्ताच आपल्या देशाला विजयी घोषित ठरणं गैर ठरेल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच ही वेळ मतभेद व्यक्त करण्याची नाही तर एकजूट होऊन सगळ्यांनी करोनाशी लढा देण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी असे म्हणाले होते की इतर देशांशी तुलना मला करायची नाही. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताने योग्य आणि कठोर पावले उचलून करोनाशी लढा दिला आहे. याबाबत जेव्हा राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ‘मला इतर देशांमध्ये काय सुरु आहे त्यावर भाष्य करायचं नाही. एवढंच सांगायचं आहे की आत्ता आपण विजय झाल्याच्या मानसिकतेत जाणं चुकीचे ठरेल’