जळगाव – लोकसभा मतदार संघातील एक प्रमुख फळ पीक म्हणून मोसंबी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केलेली आहे व करीत आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मध्ये मोसंबी या फळपिकाच्या मृग व आंबिया बहाराचा समावेश केलेला आहे.
खरीप हंगामात जळगाव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने मोसंबी फळ पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात “फळगळ” होत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. या बाबत तज्ञांकडून माहिती घेतली असता Water Stress/Extreme Change in Temperature इ. कारणाने “फळगळ” होत असल्याचे कळाले. असून होणाऱ्या नुकसानींचे फळपिक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत *मोसंबी* या फळाचे झालेल्या नुकसानीच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की मोसंबी फळ पीक विम्याचे प्रमाणके (ट्रिगर) बघितले असता माझ्या अशा निदर्शनास येते की दिनांक.1 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देय आहे. तसेच पावसाचा खंड पडल्यावर देखील नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आलेली आहे.
मी याबाबत शेतकऱ्यांशी तसेच भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचेशी चर्चा केली असता शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे सदरील नुकसानीबाबत माहिती दिलेली असून आजतागायत कुठलेही विमा कंपनीचा प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची पडताळणी केली नाही. हे अतिशय खेदजनक बाब असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तरी मी आपणास या पत्राद्वारे सूचित करू इच्छितो की आपण तात्काळ संबंधित यंत्रणेला आदेश देऊन मुख्यतः पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील गावे या ठिकाणी विमाधारक शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर जाऊन झालेल्या नुकसानीची माहिती तात्काळ संकलित करण्यात यावी व तसा अहवाल विमा कंपनी व शासनास सादर करण्यात यावा.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले नसल्यास अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल महसूल व कृषी विभाग यांच्या संयुक्त संकलित करून आपणा मार्फत शासनास अहवाल सादर करण्यात यावा.
अशी आग्रही मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज केली आहे.