• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पालकमंत्र्यांचा पुढाकार : कठोरा गावठाणचा प्रश्‍न महिनाभरात मिटणार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

गावातील बेघरांना मिळणार घरे; प्रलंबीत समस्या लागणार मार्गी

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कठोरा येथे १९८९ पासून प्रलंबीत असणार्‍या गावठाण विस्ताराच्या प्रश्‍नावरून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज बैठक घेऊन महिनाभरात हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे निर्देश दिले. यामुळे येथील बेघरांना घरे मिळणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, कठोरा (ता. जळगाव) येथे १९८९ पासून गावठाण विस्ताराचा प्रश्‍न प्रलंबीत होता. यामुळे तेथील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन याचे निराकरण करण्यासाठी साकडे घातले होते. या अनुषंगाने आज गावठाण विस्ताराबाबत आढावा बैठक येथील अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी त्यांनी वरील निर्देश दिलेत. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जळगावचे प्रांताधिकारी प्रसाद मते, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, कठोराचे सरपंच योगिता पाटील, डॉ. सत्वशील पाटील आदी उपस्थित होते.

कठोरा येथील गावठाण विस्ताराचा प्रश्न गेल्या ३५ वर्षापासून प्रलंबित आहेत. प्रांताधिकारी जळगाव यांनी १० जुलै, २०१८ रोजी निवाडा घोषित करुन गट नं. १९ मधील ०.६९ व गट नं. १७९ मधील ०.०६ हेक्टर अशी एकूण ०.७५ हेक्टर जमीन गावठाण विस्तारासाठी संपादित केलेली आहे. तसेच संपादन प्रकरणी ८९ लाख ४९ हजार ३७ इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या जमिनीचा उपयोग गावातील भूमिहीन शेतमजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना होणार आहे. संबंधित शेतकर्‍यांना नोटीस देऊन मोबदला स्वीकारुन जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात देणेबाबत नोटीसा दिल्या आहेत. परंतु अद्याप जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेली नाही. त्यामुळे घरकुले मंजूर असून लाभार्थ्यांना लाभ देता येत नाही. गावातील ३६ घरकुल लाभार्थी असून त्यातील १२ लाभार्थी हे शेतमजूर भूमिहीन व बेघर आहेत. परंतु जमीन मालक हे जमिनीचा ताबा देत नसल्याने अडचणी येत आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी श्री. मते यांनी बैठकीत दिली.यावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, सन २०२२ पर्यंत पात्र शेतमजूर, भूमिहीन व बेघरांना घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असल्याने संबंधित शेतकर्‍यांना अजून ८ दिवसांची संधी देऊन जमीन ताब्यात देणेबाबत त्यांना अवगत करावे. संबधितांनी त्यानंतरही जमीनीचा ताबा ग्रामपंचायतीकडे न दिल्यास, जमीनीचा ताबा घेणेबाबत जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी संरक्षणात आवश्यक ती कार्यवाही करण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली. जेणेकरुन गेल्या ३२ वर्षापासून प्रलंबित असलेला गावठाण विस्ताराचा प्रश्न मार्गी लागून बेघरांना घरकुले मिळण्याचा प्रश्न मार्गी लागेल. यामुळे आता येथील गावठाण विस्ताराचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
यावेळी बैठकीला तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, माजी उपसभापती मुरलीधर पाटील, सरपंच सौ. सत्वशील पाटील, उपसरपंच सरलाबाई सपकाळे, सरपंच योगीता पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सत्वशील पाटील , रामचंद्र सोनवणे, समाधान पाटील यांच्यासह ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


 

 

Previous Post

स्व. डॉ. तेजपाल चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन

Next Post

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी -माजी मंत्री आ. गिरीश महाजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी -माजी मंत्री आ. गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon