कजगाव;- येथे सालाबादा प्रमाणे दर श्रावण महिन्यात आदिवासी भिल्ल समाज बांधवाच्या वतीने पहिलवान बाबा यांना अभिवादन करण्यासाठी कजगाव व परिसरातील आदिवासी भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून पहिलवान बाबांना अभिवादन करीत असतात ह्या वर्षीही पहिलवान बाबांना आदीवासी भिल्ल समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपचे पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे एकलव्य संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख देवीदास बहिरम माजी पंचायत समिती सदस्य अशोक सोनवणे एकलव्य संघटनेचे भडगाव तालुका अध्यक्ष अक्षय मालचे खडकीचे सरपंच सचिन पवार गोंडगावचे सरपंच शिवाजी पाटील आण्णा बोरसे विजय गायकवाड गोविंद शेलार अर्जुन मालचे बाळू सोनवणे भगवान मालचे देवा सोनवणे शांताराम सोनवणे किरण सोनवणे वाल्मिक कलमे भारत सोनवणे योगेश सोनवणे प्रदीप पवार तेजस येवले आदी समाज बांधव उपस्थित होते