मुंबई (वृत्तसंस्था) – वांद्रे स्टेशनबाहेर बेकायदेशीरपणे झालेल्या मजुरांच्या ठिय्या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी आणखी 8 जणआंना अटक केली आहे. बेकायदा जमाव जमवून दंगल घडवल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आज एकूण 9 जणांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. चुकीची बातमी प्रसारित केल्याप्रकरणी एका मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पत्रकारासाहित इतर 8 जणांना आज कोर्टात हजर करण्यात येणारक आहे. तसेच यातील आणखी एक आरोपी विनय दुबेला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ‘चलो घर की ओर’ अशी सोशल पोस्ट टाकत वांद्रे स्टेशनबाहेर जमण्यासाठी मजुरांना आवाहन उत्तर भारतीयांचा नेता विनय दुबेने केले होती. त्याला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. त्याला 21 एप्रिलपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. यासोबतच ट्रेन सुरू होण्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याप्रकरणी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता प्रत्यक्ष आंदोलन प्रकरणी 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या 8 जणांवर दंगल घडवल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.








