टोकियो (वृत्तसंस्था ) ;- भारताने आजच्या दिवसाची सुरुवात महिला हॉकी संघाच्या पराभवाने केल्यानंतर आणखी एक मोठा पराभव भारताच्या नशिबी आला आहे. कुस्तीच्या 65 किलो वजनी गटात भारताचा आघाडीचा पैलवान बजरंग पुनिया पराभूत झाला आहे. त्यामुळे फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यापासून थोडक्यात राहिला. ज्यामुळे त्याच्या हातातून पदकही निसटले. .अझरबैजानचा हाजी अलीयेब याने पुनियाला मात देत ऑलिम्पिकबाहेर केलं आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इराणच्या मोर्तेजा घियासीला मात देत सेमीफायनलमध्ये बजरंगने प्रवेश केला होता. पण सेमीफायनलमध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागल्याने त्याची विजयी घोडदौड याच ठिकाणी थांबली आहे.








