पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३४७ / २०,२२ लगत अप लाईनवर कजगाव स्थानकाजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मृत महिलेची उंची ५ फुट ४ इंच आहे रंग गोरा, अंगावर पिंक बदामी रंगाची साडी, हिरव्या रंगाची चोळी परिधान केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून अशा वर्णनाच्या महिलेबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा रेल्वे पोलिसांशी संपर्क क्रं. ९०२८१५२९६७ व ९८२३५१३३५६ वर संपर्क साधण्याचे आवाहन तपासी अंमलदार ए. एस. आय. ईश्वर बोरुडे यांनी केले आहे. पुढील तपास पी. एस. आय. रमेश वावरे यांचे मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे.