जळगाव (प्रतिनिधी) – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त आज शिवाजी नगर मधील राजवाडा मित्र मंडळातर्फे प्रतिमापूजन व लहान मुलांना गोळ्या बिस्किटांचे वाटप करुन त्यांच्या समाजकार्याबद्दल माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाजसेवक विजय राठोड (मा.शिवसेना विभाग प्रमुख) यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश अंभोरे, उपाध्यक्ष छोटू परदेशी,रिपब्लिकन पार्टीचे (आठवले गट) अध्यक्ष शंकर भोसले, आकाश आंभोरे,लोकेश अंभोरे,चेतन दलाल,छोटू साबळे,पिंटूभाऊ परदेशी, रफिक बाबा,अभिमानकाका आंबोरे, तुकारामकाका आंबोरे,किरण आंबोरे, शमशुद्दीन शेख,गजानन आंबोरे,नाना धनगर,अनिल बिराडे,विलासकाका दलाल,मदन काका परदेसी, अजय अंभोरे,देविदास साबळे,किरण अंभोरे व राजवाडा परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.









