जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील एका भागात राहणार १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रेणूका नगरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. १ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे उघडकीला आले. नातेवाईक आणि मैत्रीणीकडे शोधाशोध केली परंतू मुलगी मिळाली नाही. पिडीत मुलीच्या वडीलांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड करीत आहे.







