जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको भागात पठाण पैलवान यांच्या पोल्ट्री फार्म हाऊस जवळ जुगार अड्ड्यावर रात्री रामानंद नगर पोलिस कर्मचाऱ्यांनी छापा टाकून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा शिवारात असलेल्या पठाण पहिलवान पोल्ट्री फार्म हाऊसच्या मागील बाजूस एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जण जुगार खेळ खेळत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आज रविवार 1 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास पथकाला रवाना करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयीत आरोपी शेख रशीद शेख शब्बीर (वय 38) राहणार ख्वाजा नगर पिंप्राळा हुडको, सुफियान खान फाईम खान (वय 22) राहणार सलार नगर जळगाव फिरोज शेख समशेर पिंजारी (वय 31) राहणार आजाद नगर पिंप्राळा आणि गौतम शामराव साबळे (वय 45) राहणार पिंप्राळा हुडको या चौघांना जुगार खेळताना अटक केली. त्यांच्या ताब्यातील 8 हजार 870 रुपयांची रोकड, 4 मोबाइल आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात पोलीस नाईक शिवाजी धुमाळ यांच्या फिर्यादीवरून रविवार रात्री 10 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







