अमळनेर (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असते. त्यात हिंदू नववर्ष रॅली, हनुमान जयंती,विवेकानंद स्कुलच्या माध्यमातून विविध पुरस्कार वितरण करणे, प्रताप शेठजी जयंती , होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करणे असे अनेक उपक्रम श्री बजरंगशेठ अग्रवाल राबवित असतात.त्यांची ती नात. राधेश्याम अग्रवाल यांची मुलगी यशस्वी ही पुणे येथील सी.बी.एस.ई. माध्यमाच्या व्ही. के. पाटील मेमोरियल स्कुल ला शिक्षण घेत आहे.
नुकताच एच.एच.सी सी.बी. एस. ई. चा निकाल घोषित झाला. पुणे जिल्ह्यातून कॉमर्स शाखेतून प्रथम अमळनेरची यशस्वी अग्रवाल आली आहे. तिला ९८.२० टक्के मार्क मिळाले आहे. यशस्वीच्या घरात तिचे वडील राधेश्याम अग्रवाल, काका नीरज अग्रवाल, काकू ममता अग्रवाल, आत्या कविता अग्रवाल हे सर्व सी.ए. आहेत. यशस्वी ला ही पुढे सी.ए. बनायचे आहे.तिला मिळालेल्या यशाचे कौतुक सर्व मित्रपरिवार करीत आहे.








