• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी आडवी लावून दरोडा टाकणाऱ्या चौघांचा जामीन अर्ज नामंजूर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी ते पहूर रोडवरून जाणाऱ्या ट्रकसमोर दुचाकी आडवी लावून चौघांनी दरोडा टाकून ट्रकचालकाकडून ८ हजार रूपये रोख घेवून ट्रचालकासह क्लिनरला मारहाण केल्याची घटना ३० जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील अटकेत असलेले चौघांनी आज ३१ जुलै रोजी जामीनासाठी अर्ज केला असता तो न्यायालयाने नामंजूर केला आहे.

शुभम प्रकाश बारी (वय २०) रा. वाडी दरवाजा शेंदुर्णी, रोशन दत्तात्रय बडगुजर (वय १९) रा. सोयगाव रोड पाण्याच्या टाकीजवळ, गोरख बापू पाटील (वय १९) रा. वाडी दरवाजा, अक्षय प्रकाश पाटील (वय २०) रा. संजयदादा नगर शेंदुर्णी असे अटकेत असलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
दरोड्याची घटना अशी आहे की, चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील दशरथ बबन बागुल हे ३० जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वाहन चालक असून ते (एमएच १० एडबल्यू ७३३६) क्रमांकाच्या ट्रकने पेपरची जूनी रद्दी घेवून भडगाव पाचोरा मार्गे आकोला येथे घेवून जात होते. शेंदुर्णी ते पहूर रोडवरील गोंदेगावाजवळ पहूरकडे येत असतांना पाच ते सहा युवकांनी ट्रकसमोर दुचाकी लावून वाहन थांबविले. यातच एकाने दुचाकीवरुन खाली उतरून हाताने ट्रकचे हडलाईट फोडीत चालकाच्या खिशातून ८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास करीत फिर्यादीसह क्लिनरला मारहाण करीत दरोडा टाकला होता. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेत संशयित आरोपीने ट्रकचे हेडलाईट फोडल्याने गंभीर दुखापत झाली होती. संशयित आरोपी हा उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आलेला असल्याचा सुगावा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार सीसीटीव्हीच्या आधारे संशयीत आरोपी शुभम प्रकाश बारी (वय २०) रा. वाडी दरवाजा शेंदुर्णी, रोशन दत्तात्रय बडगुजर (वय १९) रा. सोयगाव रोड पाण्याच्या टाकीजवळ, गोरख बापू पाटील (वय १९) रा. वाडी दरवाजा, अक्षय प्रकाश पाटील (वय २०) रा. संजयदादा नगर शेंदुर्णी या चौघे त्यात दिसून आले. पथकाने या चौघांच्या मुसक्या आवळून चौकशी केली असता, त्यांनी दरोडा टाकलयाची कबुली देत गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील काढून दिली. तेव्हापासून ते कारागृहातच होते. आज शनिवारी ३१ जुलै रोजी चौघे संशयित आरोपींनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. चौघांचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे.


 

 

Previous Post

नुतन मराठा समोरून मोबाईल लांबविणाऱ्यास अटक ; गुन्हा दाखल

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात ४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात ४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon