जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ द्वारा “प्रतिनिधित्व बचाओ, लोकतंत्र बचाओ!” आंदोलनाचे चौथे चरण ‘आरक्षण दिन जिल्हास्तरीय बहुजन आक्रोश मोर्चा’ याचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले होते.सुमित्र अहिरे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालया समोर विश्वासराव पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा, प्रा.डाॅ.प्रकाश कांबळे यांचे भाषणे झाली.



जिल्हाधिकारी यांना प्रकाश इंगळे जिल्हाध्यक्ष, विलास चिकणे जिल्हा कोषाध्यक्ष, किशोर नरवाडे जिल्हा प्रभारी RMBKS, रेखा मेश्राम राज्य सदस्या आरोग्य विभागRMBKS, वैशाली भालेराव या प्रतिनिधी मंडळामार्फत निवेदन देण्यात आले. बहुसंख्य मूलनिवासी कर्मचारी तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच संघटीत क्षेत्रातले कर्मचारी व असंघटित क्षेत्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







