पाचोरा (प्रतिनिधी) – येथील श्री शेठ मुरलीधर जी मानसिंगका महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी( बी एच यु) वाराणसी येथील विद्यार्थी स्वीकार राजेश बांठिया आणि त्यांची ऑटोमोबाईल रिसर्च टीम अवरेरा यांनी शेल इको मॅरेथॉन 2021 या जागतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून संस्थेसह देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
जगभरातून पन्नास देशातील 235 संघांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंदविला होता या स्पर्धेत सहभाग घेत एक अत्याधुनिक कार मॉडेल तयार केले ज्यामध्ये चालकाच्या सुरक्षितते सोबतच वाहनाचे वजन हलके करणे या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांचा समावेश आहे टीम अवरेरा ला 8250 अमेरिकन डॉलर्सची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली.
या यशाबद्दल पिटीसी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजयजी वाघ यांचे हस्ते त्याला नुकतेच सन्मानित करण्यात आले. या सत्कार प्रसंगी श्री गो से हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री सुधीर पाटील सर उपमुख्याध्यापिका सौ पी एम वाघ मॅडम, पर्यवेक्षक श्री आर एल पाटील सर ,श्री एन आर ठाकरे सर ,श्री ए बी अहिरे सर तांत्रिक विभाग प्रमुख श्री एस एन पाटील सर, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री मनिष बाविस्कर सर ,तसेच कार्यालयीन अधिक्षक श्री अजय सिनकर ,श्री आकाश दादा वाघ ,श्री भगवान पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.








