वरणगाव (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे वीज खांबाला स्पर्श झाल्याने धनराज निळे यांच्या म्हशीचा जागीच मृत्यू झाला.

विद्युत कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. दोन दिवसापूर्वी बोहर्डी शिवारामध्ये शेतात काम करणाऱ्या एका इसमाचा इलेकट्रीक ताराला स्पर्श झाल्यामुळे शॉक लागून मृत्यू झाला होता, पुन्हा तसाच प्रकार ओझरखेडा गावातील धनराज निळे यांची एक ते दीड लाख रुपये किंमतीची गाभण म्हैस चारण्यासाठी सोडली असता विद्युत खांबास स्पर्श झाल्यामुळे करंट लागुन जागीच मृत्यू पडले आहे. सध्या पावसाळा सुरू आहे तीन दिवसापासून सतत जोरदार पाऊस आहे, त्यामुळे विद्युत खांबामध्ये करंट येण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत वारंवार विद्युत कंपनी सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हशीला वाचवण्यासाठी मालक धनराज निळे गेले असता त्यांनाही जोराचा शॉक लागला आहे. विद्युत कंपनीने तातडीने म्हैस मालकास भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.







