• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचा 100 टक्के निकाल

विद्यार्थीनी ठरल्या अव्वल : कु. चंचल पवार स्कूलमध्ये प्रथम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 17, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता 10 वी चा 100 टक्के निकाल लागला. यात विद्यार्थीनींनी बाजी मारली. चंचल कैलास पवार-प्रथम (99.60 %), ओजस्विनी किरण बोरसे- द्वितीय (99.00 %) व शर्वरी हेमंत वाडकर- तृतीय (98.40 %) ठरली. गुणवत्ताधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन तसेच जैन इरिगेशनचे सह-व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले.

शास्त्र, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयात तर बहुतांश विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण पटकावले आहेत. शास्त्र विषयात शर्वरी वाडकर, चंचल पवार, रोशन पवार, पवन राऊत, गणित विषयात पवन राऊत, रोशन पवार, चंचल पवार, ओजस्विनी बोरसे, श्रुती खैरनार तर सामाजिक शास्त्र या विषयात कल्पना जोशी व चंचल पवार यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. 10 व्या इयत्तेसाठी एकूण 72 विद्यार्थी होते. त्यांची टक्केवारी पाहिली असता 90% च्यावर गुण मिळविणारे 11, 80 ते 89 टक्के गुण मिळविणारे 19, 75 ते 79 टक्के गुण मिळविणारे 15 विद्यार्थी आहेत. सर्वच वि्दयार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.
“अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत असलेल्या या वि्दयार्थ्यांना ‘कोविड-19’ च्या आव्हानात्मक परिस्थितीत खूप अडचणी आल्या असल्या किंवा परीक्षा झाली नसली तरी सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत निष्ठेने व सातत्याने आपला अभ्यास चालू ठेवला ह्या गोष्टीचे मला कौतुक आहे,” अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे व भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केली.

शाळेत प्रथम आलेली कु. चंचल पवार हिचे वडील सेल्समन असून ते घरोघरी जाऊन आरोग्य व सौंदर्य प्रसाधनांची विक्री करतात. “आपल्या कन्येने मिळविलेल्या यशामुळे आम्ही सर्व आनंदात आहोत”, अशी प्रतिक्रिया तिच्या आई-वडिलांनी नोंदविली. स्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु. ओजस्विनी बोरसेचे वडील बांधकाम क्षेत्रात काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. शर्वरी वाडकर हिचे वडील एका मेडिकल दुकानात कामावर आहेत. अशा प्रकारे परिस्थितीशी दोन हात करून अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

फोटो कॅप्शन -अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता दहावीत पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी.


 

 

Previous Post

बंद घर फोडून रामेश्वर कॉलनीत चोरी ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

किरकोळ कारणावरून एकाला काठीने बेदम मारहाण ; एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

किरकोळ कारणावरून एकाला काठीने बेदम मारहाण ; एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon