• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

एका ट्रकची अशीही गोष्ट… मित्राने केली मित्राशीच गद्दारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 14, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – २० हजारांची उधारी , लाखोंचा ट्रक आणि मित्राकडूनच मित्राची झालेली पळवा पळाव … मैत्रीतील गद्दारी … एका प्रकरणातून समोर आली आहे. यात पोलिसांनी लुबाडणाऱ्या मित्राच्या मुसक्या आवळल्या आहे.

कैलास सोनू चव्हाण (देव्हारी – धानवड ता.जि. जळगाव) हा ट्रक चालक असून निलेश राजेंद्र परदेशी हा त्याचा मित्र होता. निलेश परदेशी हा देखील ट्रकचालक असून दोघे एकमेकांना परिचीत आहेत. कैलास याने निलेश परदेशी याचेकडून विस हजार रुपये उधार घेतले होते. गेल्यावर्षी लॉकडाऊन कालावधीत निलेश परदेशी हा कैलास याच्याकडे त्याचे विस हजार रुपये परत मागण्यासाठी आला होता. मात्र लॉकडाऊन सुरु असल्यामुळे नंतर देतो असे कैलासने निलेश यास म्हटले होते.

त्यावर उपाय म्हणून निलेशने कैलास यास त्याची मालवाहू ट्रक चालवण्यास मागीतली होती. ट्रक चालवून आलेल्या भाड्यातून विस हजाराची कमाई झाल्यानंतर दोन महिन्यात ट्रक परत करण्याच्या बोलीवर निलेश ट्रक घेऊन गेला होता. विस हजार रुपये परस्पर फिटतील या आशेने व विश्वासाने कैलासने निलेश यास लाखो रुपयांची त्याची मालवाहू ट्रक त्याच्या ताब्यात दिली.

त्यानंतर एक महिन्याचा कालावधी लोटला. कैलासने निलेशच्या मोबाईलवर ट्रक परत घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र निलेशचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. त्यामुळे कैलासने निलेशचे तो रहात असलेले चोपडा तालुक्यातील मामलदा गाव गाठले. तेथे तो आणि ट्रक दोघेही नव्हते. नातलगांच्या मदतीने कैलासने ट्रकचा शोध सुरुच ठेवला.

दरम्यान 7 जुलै रोजी सदर ट्रक माल घेऊन नागपूर येथे गेला असल्याची माहिती कैलासला मिळाली. तेथे कैलासने निलेश यास गाठले. तेथे निलेश यास ट्रकची विचारणा केली असता तो म्हणाला की ट्रक जळगावला आहे. त्यामुळे कैलास व त्याचे सोबती पुन्हा जळगावला परत आले. मात्र ट्रक जळगावला नव्हती. त्यामुळे पुन्हा निलेश यास विचारणा करण्यात आली. त्यावेळी ट्रक चोपडा येथे असल्याचे निलेशने सांगितले. पुन्हा सर्व जण चोपडा येथे गेले. मात्र ट्रक चोपडा येथे देखील नव्हती. निलेश आपली फसवणूक करत असल्याचे कैलासच्या लक्षात आले. आपली ट्रक निलेशने कुठेतरी लपवून ठेवली असल्याचे कैलासच्या लक्षात आले. या प्रकरणी कैलास चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार 13 जुलै रोजी एमआयडिसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि.प्रताप शिकारे यांच्या निर्देशाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सैय्यद , सचिन पाटील यांनी त्याचा शोध घेत त्याला त्याच्या गावातून मामलदा ता. चोपडा येथून अटक केली. न्या. प्रिया मेढे यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी निलेश परदेशी यास तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


 

Previous Post

अभाविपच्या “परिषद की पाठशाला”ला पोलीस अधीक्षकांची भेट

Next Post

यावल सराफ दुकानावर दरोडा प्रकरणी ; एक संशयित पकडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावल सराफ दुकानावर दरोडा प्रकरणी ; एक संशयित पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
जैन कंपनी

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

१ एक पेड माँ के नाम उपक्रमात गोदावरी नर्सिंगच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग 

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon