जळगाव (प्रतिनिधी) – बीएचआर कारवाईच्या दुसर्या सत्रात अटक करण्यात आलेले जळगावातील भंगाळे गोल्डचे मालक भागवत भंगाळे यांच्यासह अकरा संशयितांना जामीन मिळाला आहे…..काय अटी शर्ती व कोणाला जामीन वाचा केसरीराजवर….
राज्यभरात गाजत असलेल्या बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्यात दुसर्या सत्रात 11 संशयितांना अटक करण्यात आली होती. यात अनेक बड्या नावांचा समावेश होता. पूर्ण राज्यभरात या कारवाईने खळबळ उडवून दिली होती. 17 जून रोजी जळगाव जामनेरात छापासत्र टाकून तपासाधिकारी भाग्यश्री नवटके यांनी ही कारवाई केली होती. तेव्हापासून या संशयितांना पुणे येवरवाडा कारागृहात हलविण्यात आले होते. बुधवारी या 11 संशयितांच्या जामीनावर कामकाज झाले. त्यात त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सरकारी वकील अँड. प्रवीण चव्हाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
काय सांगितले सरकारी वकिलांनी
या प्रकरणात सरकारपक्षाकडून अॅड. प्रवीण चव्हाण हे कामकाज पाहत आहेत. यात 11 संशयितांना विविध अटी शर्तींवर हा जामीन मंजूर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यात दहा दिवसाच्या आत त्यांना 20 टक्के तसेच ऑक्टोबरपर्यंत वीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे. याचा सरकारपक्ष न्यायालयात हिशेब मांडणार असून तेव्हा जामीनावर कामकाज होणार आहे. न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात हे कामकाज झाले असून 11 संशयितांना तात्पुरता जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन हे सर्व संशयित जळगावात परतणार आहेत.
यांना मिळाला जामीन
भंगाळे गोल्डचे मालक भागवत भंगाळे, उद्योजक प्रेम कोगटा, जयश्री मणियार, संयज तोतला, जितेंद्र पाटील, छगन झाल्टे, आसीफ मुन्ना तेली, जयश्री तोतला, प्रितेश जैन, अंबदास मानकापे यांना जामीन मिळाला आहे.