जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पहूर येथील शहरात व परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या कारणावरून आज येथील ग्रामस्थांनी उपविभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ उपविभागीय अधिकारी व्ही. डी. सोनवणे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात पहुर शहरात व परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांना आजारी पडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे त्यामध्ये कोरोना तिसरी लाट आल्यामुळे नागरिक घाबरून गेले आहे. शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. सदर आपण वीज पुरवठा सुरळीत करावा, अशा मागण्यांचे निवेदन उपअभियंता व्ही. डी. सोनवणे यांना सादर केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुमावत, शिवसेनेचे गणेश पांढरे, शरद इंगळे, विशाल राऊळकर, सुनील कुमावत, हेमंत कुमावत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.