जळगाव (प्रतिनिधी) — शहरातील खोटेनगर परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ एका पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खुन झाल्याची घटना रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली. महेश वासुदेव पाटील ऊर्फ डेम्या असे मयत तरुणाचे नाव असून तालूका पोलिस घटनास्थळावर दाखल झाले आहे.
हा आहे वासुदेव पाटील ऊर्फ डेम्या मृत्यू अवस्थेत
जळगाव शहरातील खोटेनगरातील रहिवासी महेश वासुदेव पाटील ऊर्फ डेम्या या तरुणाला बापू राजपुत नामक व्यक्तीने मागील भांडणाच्या कारणावरुन धारदार शस्त्राने भोसकल्याची घटना घडली. खुन झाल्यानंतर पोलीस निरीक्षकांसह पोलिस ताफा घटनास्थळावर दाखल झाला. मृदतेह जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डेम्याच्या कुटूंबीयांसह मित्रांनी आक्रोश करत संताप व्यक्त केला.
घटनास्थळी पोलीस पाहाणी करताना
बापू राजपूत हा एका गुन्हात नाशिक येथे शिक्षा भोगत होता . सध्या तो कोरोना पँरोल सुट्टी वर आलेला होता. परत त्याने पूर्ववैमनस्यातून वासुदेव पाटील ऊर्फ डेम्या या तरुणाचा खुन केला.
हा आहे बापू राजपूत जिल्हा रुग्णालयात जखमी अवस्थेत