शिरसोली ता. जळगाव ( प्रतिनिधी ) ;- राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे आज १० जुलै रोजी जळगाव जळ दौऱ्यावर असतांना पाचोरा येथे जात असतांना तालुक्यातील शिरसोली येथे शिवसैनिकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. किशोर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. एकनाथराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांची विचारपूस करून ते पाचोरा येथे रवाना झाले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, सरपंच प्रदीप पाटील ,माजी अल्पसंख्यांक शिवसेना तालुकाध्यक्ष अकील मेंबर मणियार ,नाना सोनवणे , अनिल पाटील, मुरलीधर ढेंगळे, नितीन बुंदे,नाना पाटील, भगवान पाटील, पांडुरंग बोबडे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.