जळगाव (प्रतिनिधी) – श्रीक्षेत्र श्रावणतळे राजदेहरे येथील ७५० वर्षापूर्वीचे पुरातन सर्वेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार सोहळा दि.७ जुलै रोजी श्रीनाथ महाराज, आमदार मंगेशदादा चव्हाण व शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी श्रीनाथ महाराज यांचे दर्शन घेत आशिर्वाद प्राप्त केले तसेच भाविक भक्तांशी संवाद साधत त्यांच्यासोबत महादेवाच्या भंडाऱ्यात प्रसाद घेतला.
बालब्रह्मचारी श्रीनाथ महाराज यांच्या वास्तव्याने श्रीक्षेत्र श्रावणतळे परिसराचे आध्यात्मिक महत्व वाढले आहे व त्यांच्या प्रेरणेने आता सर्वेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार होत असल्याने सदर ठिकाणी मोठे अध्यात्मिक केंद्र निर्माण होणार आहे. भक्त परिवाराने देखील अतिशय मनोभावे या मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी ज्यापद्धतीने देणगी गोळा केली तेदेखील एक आदर्श उदाहरण असल्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सांगितले. आमदार म्हणूनच नव्हे तर एक वारकऱ्याचा मुलगा या नात्याने सदर परिसराच्या धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे देखील आमदार चव्हाण यांनी सांगितले.
सदर जिर्णोद्धार सोहळ्याला शिवाजी नाना हडपे, अनिलभाऊ नागरे, संतोष मोकाटे, ज्ञानेश्वर बागुल, ज्ञानेश्वर माने, काशिनाथ फत्तू, सोमनाथ दत्तू, रमेश बन्सी राठोड, अप्पासाहेब माने, संतोष देशमुख, संग्राम पदंम जाधव यांच्यासह शेकडो भाविक भक्त उपस्थित होते.