जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील अक्षया सिटीस्कॅन सेंटर जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले असून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्याहस्ते आज ८ रोजी उद्घाटन करण्यात आले . यावेळी सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संचालकांनी दिली. आकाशवाणी चौकाजवळील विद्यानगर येथे अक्षया सिटी सिटीस्कॅन सेंटर येथे नागिरकांनी सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांनी केले आहे. यावेळी गोपाळराव देवकर , विशाल देवकर , प्रफुल्ल देवकर, लीलाधर तायडे, अजय सोनवणे, सुनिल माळी, अशोक लाडवांजरी, परेश कोल्हे, दिलीप माहेश्वरी, निलेश पाटील, मंगला पाटील, खुशाल चव्हाण, सुजित शिंदे, मोहन पाटील सर, धनराज माळी, बापू परदेशी, संतोष नेटके,धवल पाटील, डॉ नितीन पाटिल उपस्थित होते.