पाचोरा (प्रतिनिधी ) ;-पाचोरा येथील भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पाचोरा भडगाव तालुक्यातील रखडलेल्या समस्यांबाबत आमदारांनी गेल्या सात वर्षात विधान सभेत सभेत चकार शब्ददेखील काढला नसुन ते या समस्यांवर फक्त स्थानिक स्तरावर पत्रकार परिषद घेऊन व चमकोगिरी करत फक्त समस्यांची राजकारण करत असतात. आणि पाचोरा भडगाव तालुक्यातील जनतेला प्रत्येक निवडणुकीत या सर्व समस्यांबाबत आश्वासित करून निवडणुका जिंकण्यासाठी जनतेच्या भावनांशी खेळत आहेत. परंतु प्रत्यक्षात या समस्यांबाबत त्यांनी आज पाहतो विधान भवनात चकार शब्द काढला नसून ्यांना होऊ घातलेल्या आधी आठवण म्हणून अमोल शिंदे यांनी श्वेतपत्रिका काढून खालील मुद्यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात प्रामुख्याने नंबर एक गेल्या दोन महिन्यापूर्वी दिल रब्बी हंगामाच्या शेतमाल विक्रीसाठी पाचोरा भडगाव तालुक्यातील शेती संघाकडून ज्वारीसाठी जवळपास दोन हजार शेतकऱ्यांनी व मक्यासाठी तेरा शेतकऱ्यांनी आणि गहू साठी शेतकऱ्यांना नोंदणी करून करून देखील प्रत्यक्षात कर दिला. 22 जून रोजी सुरुवात झाली त्यातही फक्त पाचोरा तालुक्यातून 39 शेतकऱ्यांची व भडगाव तालुक्यातील 83 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी केली गेली. तरी उर्वरित शेतकऱ्यांच्या शेतमालाचे काय व कधी खरेदी होईल याबाबत अधिवेशनात आमदार महोदयांनी स्वतःच्या सरकारला जाब विचारावा व शेतकरी बांधवांचा हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी केली . महावितरणकडून अजूनही शेत कृषी पंपाची वीज कनेक्शन तोडणी ुरूच आहे आमदारांनी सत्ताधारी पक्ष असून देखील शेतकऱ्यांच्या समस्या चे राजकारण करत नौटंकी आंदोलन केले होते तरीदेखील शेतकर्यांची वीज जोडणी थांबलेली नाही. तरी आमदारांनी सदर विषय अधिवेशनात लावून ठेवावा त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री व त्यांच्या सरकारमधील उंची ऊर्जामंत्री यांना तसे आदेश काढण्यासाठी भाग पाडावे. वडगाव शहरात अनिमित होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गिरणा नदीवर बंधारा बांधून जलशुद्धीकरण केंद्र स्थापन करून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा व्हावा याची मागणी प्रामुख्याने करावी जेणेकरून दरवर्षी वडगाव येथील जनतेचे उन्हाळ्यात होणारे हाल कमी होतील .
भडगाव येथील जनतेने नेहमी मागणी लावून ठेवलेला मटन मार्केट ते भडगाव पेठ मुलाचे आज पाहतो काम सुरु झाले नसून भडगाव येथील जनतेला दैनंदिन जीवनात याचा त्रास सहन करावा लागत आहे तरी आमदार महोदयांनी अधिवेशनात या विषयावर मागणी करून हा विषय मार्गी लावावा .

पाचोरा भडगाव तालुक्यात एमआयडीसी औद्योगिक विकास वसाहत विकसित करण्यासंदर्भात फक्त आमदार महोदयांनी वल्गना केल्या असून प्रत्यक्षात कामाची सुरुवात कुठे झालेली दिसून येत नाही तरी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा व्हावी .
मैत्री कंपनीमध्ये ग्राहकांनी गुंतवणूक केलेले पैसे त्याला त्वरित मिळावी यासाठी आमदार फक्त स्थानिक स्तरावर बैठका घेऊन जनतेला खोटी आश्वासने देतात यासंदर्भात अधिवेशनात या विषयावर विशेष चर्चा करून हा देखील विषय मार्गी लावा.
कोरोना काळात आमदार माशांनी पाचोरा भडगाव येथे पंधरा दिवसात स्वतंत्र ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित करू असे सांगून जागेची पाहणी देखील केली. परंतु अजून पर्यंत ऑक्सीजन प्लांट कागदावरच आहे. तरी आमदार महोदयांनी तिसऱ्या लाटेचा धोका बघता या संदर्भात देखील अधिवेशनात आवाज उठवावा समस्या बाबत आमदार महाशय या वेळी नक्कीच अधिवेशनात परखडपणे मांडतील अशी अपेक्षा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.







