पाचोरा- पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी तर्फे खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त भास्कर नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी यांच्या सूचनेप्रमाणे हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्योतीताई वाघ(तनिष्का गटनेत्या पाचोरा) यांचेहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सरलाताई पाटील,पाचोरा तालुक्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई देवरे, शहराध्यक्षा सुनीता ताई देवरे,जयश्रीताई मिस्तरी,सुरेखाताई पाटील,भारतीताई देशमुख,अनिताताई देवरे,सुनीताताई पाटील,प्रतिभाताई पाटील,निर्मलाताई खैरनार,सुनीता वारुळे,दिपमला पाटील,आशाताई जोगी यांचे सह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.