अमळनेर ;- येथील खाजा नगर ,तांबेपुरा भागात दि 10 ला रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राकेश चव्हाण व अन्य सात ते आठ जणांनी तुमच्या मुळे कोरोना आजार पसरतो असा आरोप करीत धार्मिक स्थळाची विटंबना केली व दगड फेक करीत शिवीगाळ देत असल्याने जमावाने त्यास लाकडी दांड्याने मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला.
सविस्तर माहिती अशी की, अर्धवट शिक्षणअसलेल्या राकेश हा रेल्वेत चहा विक्री करत असतांनाच त्याची गुन्हेगारांची ओळख झाल्याने गुन्हेगारी जगतात वळला होता
त्याच्या वर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. उदा छोट्या मोठ्या चोरी करणे, पिस्तूल लावून धमकी देणे, व्यापारी वर्गा कडून खंडणी मागणे, काही दिवसांपूर्वी त्याने अमळनेर रेल्वे स्टेशनला पोलीस चौकीवर हल्ला करून वाहन व चौकीचे नुकसान करून ८ ते ९ महिन्यांपासून फरार झाला होता. त्यानंतर भुसावळ येथे गावठी बंदूकसह सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी त्याला शिताफीने अटक केली होती. असे गंभीर गुन्ह्या मध्ये त्याचा सहभाग असल्याने त्याची परिसरात सराईत गुन्हेगार म्हणून त्याची ख्याती झाली होती.
राकेश वसंत चव्हाण हा एका गुन्ह्यात जळगाव जेलमध्ये असतांना त्याने तेथील कैलास नवघरे नामक गुन्हेगाराला गंभीर जखमी केले होते म्हणून त्याची रवानगी लातूर जेल मध्ये केली होती. त्याची दोन दिवसापुर्वीच पॅरोलवर सुटका झाल्याने तो नुकताच परवा दि ९ एप्रिल च्या रात्री लातूरहुन अमळनेर शहरात आला होता. काल सायंकाळी राकेश चव्हाण व त्याच्या सोबत आणखी सात आठ जण ख्वाजानगरमध्ये गेले असता तेथील एका धार्मिक स्थळाची विटंबना करीत दगडफेक केल्याने संतप्त जमावाने त्याला लाकडी दंडक्याने मारल्याने त्याचा त्यात मृत्यू झाला चा प्राथमिक अंदाज असल्याचे काल सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी सांगितले. दरम्यान मयत राकेश च्या आई आशा बाई चव्हाण यांनी मुलाच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
तसेच दुसऱ्या गटातील शेख कादर शेख फकिरा यांनी फिर्यादित म्हटले आहे की, राकेश चव्हाण याच्या कडे कट्टा होता व अजून चार ते पाच जणांनी तुमच्या मुळे कोरोना आजार पसरत आहे असा आरोप करीत धार्मिक स्थळाची विटंबना करीत दगडं-विटा मारत शिवीगाळ केली, अशा प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याप्रकारणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास मोरे हे करीत आहे.दरम्यान चार संशयिताना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयाने दि 15 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.अन्य 30 ते 40 लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घटनास्थळी आधिकाऱ्यांनी दिली भेट
घटनेची माहिती मिळताच जळगांव पोलीस जिल्हाअधीक्षक डॉ पंजाबराव उगले, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, उप विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाणे, जळगांव गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बापू रोहम, अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, पारोळा पोलीस निरीक्षक कानडे, एपीआय ढोबळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर आदींनी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेचा तपास योग्य व जलदगतीने करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी दिली.
परिस्थिती ची गंभीरता पाहता कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून अमळनेर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत शहरासह तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवत कायदा सुव्यवस्था राखण्यात यश मिळवल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.