• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बँकेतील बचत खाते हेच तुमचे विमा संरक्षण महाराष्ट्र ग्रामीण बँकेने केली जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ;- येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाचोरा शाखेतील ग्राहक सूर्यभान बाविस्कर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. केवळ बँकेत बचत खाते असल्याचा फायदा परिवाराला मिळवून देत येथील बँकेच्या व्यवस्थापनाने अथक परिश्रम करून मयत सूर्यभान बाविस्कर यांच्या परिवाराला पाच लाख रुपये विमा रक्कम मिळवून दिली आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

12 रुपयात 2 लाखाचा विमा

सन 2014 पासून भारतातील सर्व सरकारी सहकारी व खाजगी बँकांमधील ग्राहकांना विमा सुरक्षा योजना लागू करण्यात आलेली आहे. बँक खातेदाराच्या मृत्यूला संरक्षण देणारी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) असूनयासाठी वयोमर्यादा 18 ते 70 वर्षे कोणत्याही बँकेत आपले बचत खाते असल्यास तुम्हाला योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण प्राप्त झाले आहे हे निश्चित.

330 रुपयात 2 लाखाचा विमा

बचत खातेदाराच्या मृत्यूला संरक्षण देणारी प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) असे या योजनेचे नाव आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे, खातेदाराच्या खात्यामधून वार्षिक 330 रुपये हप्ता कपात होत असल्यास प्रत्येक खातेदाराला हे विमा संरक्षण लागू आहे.

क्लेम सेटलमेंट जबाबदारी बँकेची

प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस तुमच्या बचत बँक खात्यातून या योजनांची सुरक्षा प्राप्त करण्यासाठी पहिल्या योजनेत वार्षिक 12 रुपये व दुसऱ्या योजनेसाठी वार्षिक 330 रुपये हप्ता कपात होतो. हा विमा सुरक्षा हप्ता ऑनलाइन कपात होत असल्याने बहुतांशी ग्राहकांना याबाबत कल्पना नसते. हप्ता कपातीचे अज्ञान असल्यामुळे अनेकांना प्रधानमंत्री पुरस्कृत दोन्ही विमांचा लाभापासून वंचित राहावे लागते. मयत ग्राहकाच्या परिवाराला विमा सुरक्षा मिळवून देण्याची जबाबदारी संबंधित बँक प्रशासनाची असली तरी अत्यावश्यक कागदपत्रे व दाखले यांची पूर्तता करण्याचे काम संबंधित वारसदारांची असते. सदरच्या विमा क्लेम सेटलमेंट मिळवून देणे प्रक्रिया किचकट असल्याने अनेकदा बँक प्रशासन अशी प्रकरणे हाताळण्याचे टाळते. मात्र पाचोरा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून मयताच्या परिवाराला तब्बल पाच लाख रुपये विमा रक्कम मिळवून दिली आहे.

ATM कार्डधारक विम्याचे मिळाले 1 लाख

बँकेत बचत खाते असून त्याद्वारे तुम्ही एटीएम कार्ड वापरत असाल तर प्रत्येक जूने ATM कार्ड धारकाला एक लाख रुपयाचे तर नवीन प्लॅटिनम ATM कार्ड धारकाला दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येते. पाचोरा येथील प्रकरणात संबंधित विमाधारकाकडे जुने एटीएम कार्ड असल्याने एक लाख रुपयाचा विमा त्याच्या वारसांना मिळाला.

वारस पत्नीने व्यक्त केले ऋण

महाराष्ट्र ग्रामीण बँक, पाचोरा शाखेतील ग्राहक सूर्यभान बाविस्कर यांचे काही दिवसापूर्वी अपघाती निधन झाले. त्यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना काढल्यामुळे बँकेने दोघं क्लेमच्या पाठपुरावा करून सदर वारसास सर्व पैसे मिळवून दिले. शिवाय “रुपे ATM कार्ड” वरील इन्शुरन्स सुद्धा बँकेने पाठपुरावा करून वारसास मिळवून दिला.
ग्राहकाच्या वारसाने (संगीता बाविस्कर)फक्त 12 व 330 च्या विम्यासाठी प्रोसेस केली होती!!पण शाखा व्यवस्थापकाने त्यांना रूपे कार्ड च्या विम्याबाबत ही अवगत करून त्यांना त्यासाठी आवश्यक कागदपत्रे मागवून त्याही विम्याचा लाभ मिळवुन दिला!!!
यात महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा पाचोरा यांनी सर्व नागरिकांना आवाहन करते की ही योजना 2014 पासून भारत सरकारने सुरू केली आहे तरीही अनेक सामान्य नागरिक यापासून वंचित आहेत तरी ज्या व्यक्तीनी ह्या योजनेत समाविष्ट झाले नाहीत त्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा!!! अशा प्रकारे एकूण पाच लाख रुपये मिळवून दिल्याबद्दल मयत ग्राहकाच्या वारस (पत्नी) संगीता सूर्यभान बाविस्कर यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ऋण व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कौतुक

महाराष्ट्र ग्रामीण बँक, पाचोरा शाखेतील ग्राहक सूर्यभान बाविस्कर यांच्या अपघाती निधनानंतर covid-19 परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी विमा संरक्षणाचे कागदपत्रे जुळवाजुळव करण्यास विलंब लागला. अशाही परिस्थितीत बँक प्रशासनाने क्लेम सेटलमेंट पूर्ण करून दिले. अत्यंत संवेदनशीलतेने व सहनशीलतेने हे प्रकरण हाताळून बँकेच्या ग्राहकाला न्याय मिळवून देणारे शाखा व्यवस्थापक जयंत अमृतकर, बँक अधिकारी प्रसाद दुसाने, रोखपाल मंदार साखरे व विशेष मेहनत घेणारे कंत्राटी सेवक हितेश महाजन यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


 

 

Previous Post

सिंगल डोसवाली ‘जॉन्सन अँड जॉन्सनची’ लस जुलैमध्ये मिळणार

Next Post

प्रा. जयश्री दाभाडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रा. जयश्री दाभाडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon