जळगाव (प्रतिनिधी );- आज २५ जून रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय वसंत स्मृती येथे भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्ह्याच्या वतीने स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील काळा इतिहास म्हणून नोंदल्या जाणाऱ्या आणीबाणीतील अत्याचार आणि दडपशाहीच्या कहाण्या देशातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आज व्हरच्युअल व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.सदर व्याख्यानाला भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष तथा राज्यसभेचे सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लाभली. तसेच या कार्यक्रमात ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आ. सुरेश दामू भोळे (राजूमामा), महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, यांच्या हस्ते उपस्थित मिसा बंधूं विजय नाईक, सतीशमदाने, शामराव कलभांडे, अनिल अभ्यंकर, पद्माकरजी निळे यांचा सत्कार करण्यात आला व आणीबाणी काळात मृत्युमुखी पडलेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विनयजी सहस्त्रबुद्धे यांनी युवकांना कशाप्रकारे २५ जून १९७५ या दिवशी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली, आणि देशभर दमनसत्रसुरू झाले. अत्याचार व दडपशाहीमुळे या काळात काँग्रेसने सत्तेचा व बळाचा अमानुष वापर करून देशभर भयाचे व असुरक्षिततेचे सावट निर्माण केले. मानवाधिकारांचे व माध्यमस्वातंत्र्याचे तसेच लोकशाहीचे हनन करणाऱ्या या काळातील काँग्रेसी अत्याचारांची कहाणी व आपले अनुभव युवकांना व उपस्थित मान्यवरांना आपल्या व्याख्यानाद्वारे संबोधीत केले. तसेच महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी मिसा बंधूंवर झालेल्या अत्याचार व त्यावेळेची काँग्रेस ची सत्यता या बद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे समारोपीय भाषण ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आ. सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी केले. या व्याख्यानात व्हर्चुअल zoom app द्वारे ५८३ युवक कार्यकर्त्यांनी व भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे ७० वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महानगर जिल्हासरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, वि.स.क्षे.प्रमुख दीपक साखरे, प्रदीप रोटे यांची प्रमुख उपस्थिती असून या कार्यक्रमाचे संयोजक भगतसिंग निकम यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामीण युवा मोर्चाचे मयूर पाटील यांनी व कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी ग्रामिण जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमोल पाटील यांनी केले. कार्यक्रमातील प्रमुख वक्त्यांचा परिचय युवा मोर्चा महानगर जिल्हासरचिटणीस अक्षय जेजुरकर व आभार प्रदर्शन महानगर जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा आनंद सपकाळे यांनी केले. तसेच मंडळ अध्यक्ष परेश जगताप, महानगर प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, विठ्ठल पाटील, गणेश माळी, प्रकाश पंडित, युवा मोर्चाचे मिलिंद चौधरी, महेश पाटील, राहुल मिस्तरी, विक्की सोनार, सचिन बाविस्कर, रियाज शेख, अबोली पाटील, सागर जाधव, जयंत चव्हाण, रोहित सोनवणे, गौरव पाटील, भूषण जाधव, पुष्पेंद्र जोशी, अमित साळुंखे, हर्शल चौधरी, भूषण आंबीकर ई. उपस्थित होते.