मुंबई (वृत्तसंस्था) – स्थलांतरासाठी रस्त्याने पायी जाताना पोलीस मज्जाव करीत असल्याने आता नागरिकांनी थेट लोहमार्गाचा वापर सुरू केला आहे. मुंबई ते कोकण असा रेल्वे रूळावरून पायी प्रवास करणाऱ्या 57 जणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 14 एप्रिल नंतर टाळेबंदी वाढणार आहे. महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत टाळेबंदी वाढविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढल्याने त्यांनी आता लोहमार्ग द्वारे पायी प्रवास सुरू केल्याचे समोर आले आहे. सध्या रेल्वे बंद असल्याने रुळावरून येणे जाणे कठीण असले तरी सोपे झाले आहे. मानखुर्द पर्यंत कसे बसायचे त्यानंतर थेट खाडीवरील रेल्वे रुळावरून वाशी रेल्वे स्थानकापर्यंत जीवघेणा प्रवास करीत चकवा देत हे नागरिक गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांना माहिती मिळतात पोलिसांचे पथक लावून पनवेल शहर पोलीस ठाण्यात येणाऱ्या रुळावरून पायी जाणाऱ्या सत्तावन्न जणांना ताब्यात घेतले. यात काही महिला व बालकांचा ही समावेश आहे या सर्वांची रवानगी पनवेल महानगरपालिकेच्या निवारागृहात केली आहे पर जिल्ह्यात पायी प्रवास करणाऱ्यांसाठी निवारा गृह सुरू केले आहेत. गाव गाठण्यासाठी मुंबईबाहेर निघालेल्या 57 जणांचा मुक्काम सध्या निवारागृहात करण्यात आला आहे.