• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अनाथ झालेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ द्यावा – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2021
in आरोग्य, कोरोना, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव;- कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करुन त्यांना लाभ मिळवून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिलेत.

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी गठीत कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए ए के शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, आरिफ शेख, वैजयंती तळेले, योगेश मुकावार, भानूदास येवलेकर आदि उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा 1100 रुपये शासनामार्फत बाल संगोपन योजनेद्वारे देण्यात येतात. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र बालकांना तातडीने मिळाला पाहिजे. या बालकांचे शिक्षण थांबता कामा नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर या बालकांचे वारसाहक्क अबाधित राहतील यासाठी त्यांना आवश्यक असलेले वारस प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावे. या बालकांना शासनामार्फत मिळणारे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी त्यांचे बँक खाते उघडण्यासाठी बॅकांनी मदत करावी. त्याचबरोबर या बालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सर्व संबंधित विभागांना दिलेत.

या बालकांना कायदेशीर मार्गदर्शन मिळण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल असे जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. शेख यांनी सांगितले.

सध्या जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 13 असून एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 403 इतकी आहेत. बाल संगोपन योजनेचे आदेश दिलेल्या बालकांची संख्या 62 असून 13 अनाथ बालकांचे आदेश पालकांना निर्गमित करण्यात आले आहेत. तर 184 विधवा महिलांची माहिती प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. परदेशी यांनी बैठकीत दिली.


 

 

Previous Post

जिल्ह्यात ३५ कोरोना रूग्ण आढळले; १५९ रूग्ण बरे

Next Post

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त शिव व्याख्याते संजीव सोनवणे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त शिव व्याख्याते संजीव सोनवणे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon