मुंबई (वृत्तसंस्था ) ;- मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप खासदार संभाजीराजे यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. गेल्या गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवसास्थानी मराठा आरक्षणप्रकरणी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले गेले होते.
तशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरद्वारे दिलीय. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आल्याचं संभाजीराजे म्हणाले. दरम्यान, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सरकारचं हे पाऊल म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपन असल्याचं म्हटलंय.