जळगाव (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार हे दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार मिळण्यासाठी काही इच्छुक अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींमार्फत जोरदार फिल्डींग लावल्याची चर्चा आहे.
यापुर्वी नियमित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबीता कमलापूरकर यांची बदली झाल्यानंतर प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार मिळवण्याकरीता काही इच्छुक एमबीबीएस पदवीधारक तालुका आरोग्य अधिकारी/वैद्यकीय अधिकारी व बी.ए.एम.एस. पदवीधारक वैद्यकीय अधिकारी यांच्यामध्ये झालेला संघर्ष सर्वश्रुत आहे.
नियमित जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. भीमाशंकर जमादार यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना सुद्धा अडचणीत आणण्याकरिता लोकप्रतिनीधींच्या माध्यमातुन अनेक व्युहरचना आखुन त्यांनी मजबुरीने बदली करुन घ्यावी अथवा दिर्घ रजेवर जाव व सदरील प्रभारी पदभार मिळवण्याकरीता शर्तीचे प्रयत्न केल्या जात असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
आता डॉ.जमादार हे रजेवर असल्याने प्रभारी पदभार घेण्याकरीता अनेक अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिंधी व वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे लॉबिंग केल्या जात असुन., त्यात एम.बी.बी.एस. पदवीधारक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे पारडे प्रशासकीय दृष्ट्या जड दिसत असल तरी, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटिल हे एमबीबीएस पदवी घेतलेले, अनुभवी व आधी जिल्हा स्तरावर काम केलेल्या किंवा सध्या कार्यरत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या गळ्यात प्रभारी जिल्हा आरोग्य पदाची माळ टाकतात की बी.ए.एम.एस. कि , आणखी वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची वर्णी लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.