जळगाव;- शहरातील १६ व्यापारी संकुलाचे गाळेधारकांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले असून आज उपोषणाच्या ५ व्या दिवशी घंटानाद आंदोलन केले. यावेळी गाळेधारकांच्या साखळी उपोषणाला विविध संघटना संस्थांनी आपला पाठिंबा दर्शविला .आज झालेल्या घंटानाद आंदोलनात बी.जे. मार्केटचे सुरेश पाटिल, विलास सांगोरे, मकरंद कुलकर्णी, शरद महाजन, नैलेश देसाई उपस्थित होते. तसेच दुपारी १ ते ५ राजस कोतवाल, गिरिधारी अग्रवाल, रविंद्र निकुंभ , प्रदिप श्रीश्रीमाळ, नरेंद्र दाते उपस्थित होते.
यांनी दिला पाठिंबा
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, भाजपाचे नगरसेवक अमित काळे, राष्ट्रवादीचे विनोद देशमुख, माजी नगरसेवक अजय पाटील, जितेंद्र मराठे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी डॉ.शांताराम सोनवणे, पांडुरंग काळे, तेजस देपुरा, युवराज वाघ, सुजित किनगे, पंकज मोमाया, विनोद नेवे, अविनाश भोळे उपस्थित होते.
उद्या बेमुदत साखळी उपोषणात महिला गाळेधारक सहभागी होणार आहेत.