जळगाव – कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा या उद्देशाने शासनाने यावर्षी लसीकरण मोहिम सुरु केली आहे, त्याअंतर्गत लसीकरणाच्या तिसर्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाही आता लस घेता येणार असून जळगाव शहरातील NABH मानांकित गायत्री हॉस्पीटल येथे माफक दरात ही लस उपलब्ध आहे, त्याचा लाभ जळगावकरांसह ज्यांना परदेशात जायचे आहे, त्यांनीही घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाने जानेवारी महिन्यापासून टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. यात गेल्या महिन्यापासून नागरिक देखील स्वयंस्फूर्तीने लसीकरणासाठी पुढे सरसावले मात्र लसींचा तुटवडा झाल्याने ते त्रस्त देखील झाले. मात्र आता चिंता करु नका, जळगावकरांसाठी शहरातील राधाकृष्ण कॉलनीजवळील विद्युत कॉलनी स्टॉपजवळ असलेल्या गायत्री हॉस्पीटल येथे कोविशिल्ड ही लस उपलब्ध झाली आहे. ७८० रुपयात या लसीचा एक डोस घेता येणार आहे, त्याआधी WWW.COWIN.GOV.IN संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र यापैकी एक स्वत:जवळ बाळगावे. या लसीचा दुसरा डोस हा ८४ दिवसानंतर दिला जाईल. अधिक माहितीसाठी राहुल ८८५७०८३१७०, दिपक ९५९५२२१९१७ तसेच ०२५७ २२५४४०८, ०२५७ २२५४४०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गायत्री हॉस्पीटलने केले आहे.